Personal Pronouns

Pronouns:
The word stands in place of noun is called pronoun.
Pronoun is a word used instead of a noun.

personal pronoun

Vedant got good marks because he is intelligent. All teachers like him. His parents are also well educated.

या वाक्यांत Vedant हे नाम एकदा वापरल्यानंतर त्याच्याविषयी पुन्हा उल्लेख करताना तेथे he हा शब्दप्रयोग केला आहे म्हणजेच he हे नामा ऐवजी वापरले आहे म्हणजेच ते सर्वनाम आहे.
त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित आणखी माहिती सांगताना त्या नामाचा पुन्हा वापर न करता him, his या सारखे शब्दप्रयोग वापरले आहेत. ती सुद्धा सर्वनामेच आहेत. यांनाच पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात.
अशाच काही पुरुषवाचक सर्वनामांची माहिती आपण या भागामध्ये घेणार आहोत.
पुरुषवाचक सर्वनामे ही प्रथमा, द्वितीय आणि षष्ठी विभक्तीच्या आधारे वापरली जातात. त्यामध्ये पुन्हा प्रथम पुरुष द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष यानुसार वेगवेगळी रूपे वापरली जातात.

1.प्रथम पुरुष Personal Pronouns in first person

प्रथमा विभक्ती Subjective case

I – मी
we – आम्ही

द्वितीय विभक्ती Objective case

me – मला
us – आम्हाला

षष्ठी विभक्ती Possessive case

my – माझा, माझी, माझे, माझ्या
our – आमचा, आमची, आमचे, आमच्या

2.द्वितीय पुरुष Personal Pronouns in Second person

प्रथमा विभक्ती Subjective case

you – तू
you – तुम्ही

द्वितीय विभक्ती Objective case

you – तुला
you – तुम्हाला

षष्ठी विभक्ती Possessive case

your – तुझा, तुझी, तुझे, तुझ्या
your – तुमचा, तुमची, तुमचे, तुमच्या

3.तृतीय पुरुष Personal Pronouns in Third person

प्रथमा विभक्ती Subjective case

he – तो
she – ती
it – तो, ती, ते
They – ते, त्या, ती

द्वितीय विभक्ती Objective case

him – त्याला
her तिला
it – त्याला, तिला
them – त्यांना

षष्ठी विभक्ती Possessive case

his – त्याचा, त्याची, त्याचे, त्याच्या
her – तिचा, तिची, तिचे, तिच्या
its – त्याचा, तिचा, तिची, तिचे, तिच्या
their – त्यांचा, त्यांची, त्यांचे, त्यांच्या

टीप – नामाचे लिंग व वचन यानुसार he, she, it, they, him, her  या पुरुषवाचक सर्वनामांचा विचार करावा लागतो व उपयोग करावा लागतो…